जम्मू कश्मीर: Hizbul Mujahideen चा कमांडर Riyaz Naikoo चा बेघपोरा मध्ये खात्मा; भारतीय लष्कराचं मोठं यश!
Encounter | Representational Image | (Photo Credits: IANS)

जम्मू कश्मीरच्या खोर्‍यात मागील काही दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये आज सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. हिज्बुल मुजाहुद्दीन (Hizbul-Mujahideen)  चा कमांडर Riyaz Naikoo याला Beighpora भागात  कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हा भारतीय लष्कर आणि सुरक्षा जवानांसाठी मोठी अभिमानस्पद कारवाई आहे. मागील 8 वर्षांपासून त्याची कश्मिरच्या खोर्‍यात दहशत होती. वरिष्ठ अधिकार्‍यांनी रियाझ नायकूचा खात्मा म्हणजे दक्षिण कश्मिर दहशतवादाच्या भीतीमधून मुक्त झाल्यासारखं म्हटलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून कश्मिरच्या खोर्‍या दहशतवादी कारवायांना जोर आला होता. यामध्ये भारताने कर्नल, मेजर सह 8 जवान गमावले होते. त्याचा बदला आता हिज्बुलच्या कमांडरचा खात्मा करून घेण्यात आला आहे. पुलवामा येथील बेघपोरा भागात भारतीय लष्कर, सीआरपीएफ जवान, जम्मू कश्मिर पोलिस यांनी एकत्र सापळा रचून रियाझचा खात्मा केला आहे. रियाझ नेमका कुठे लपलाय याची टीप मिळाल्यानंतर मंगळवार 5 मे च्या रात्रीपासूनच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. सुमारे तासाभराच्या चकमकीनंतर रियाझला ठार करण्यात यश आलं आहे. यावेळेस पोलिसांनी कश्मिर खोर्‍यात वाहतूकीवर निर्बंध घातले होते.  (हेही वाचा, Jammu & Kashmir: अवंतीपोरा भागातील शार्शाली ख्रू येथे सुरक्षा दलाकडून एका दहशवाद्याला कंठस्नान; पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक सुरूच)

ANI Tweet 

मागील वर्षी मे महिन्यात झाकीर मुसाच्या मृत्यूनंतर रियाझकडे सूत्र आली होती. रियाझ नायकू पूर्वी शिक्षक होता. दक्षिण कश्मिरमध्ये त्याचा दबदबा होता. त्याने सुरक्षांकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांना गन सेल्युट देण्याची प्रथा सुरू केली होती. जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर त्याने अ‍ॅन्टी इंडिया कॅम्पेन देखील सुरू केलं होतं. दरम्यान समाजात कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी म्हणून तो सोशल मीडियामध्ये तरूणांच्या मदतीने खोट्या बातम्या पसरवत असल्याची माहिती देखील एका वरिष्ठ ऑफिसरने दिली आहे.