Representational Image (Photo Credit: PTI)

Jammu & Kashmir: अवंतीपोरा (Awantipora ) येथील शार्शाली ख्रू (Sharshali Khru) भागात चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचे समजत आहे. जम्मू काश्मीर पोलिस (J&K Police)आणि भारतीय सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली असून, अजूनही याभागात दोन्ही गटांमध्ये चकमक सुरु आहे. काल रात्री अवंतीपोरा येथील शार्शली ख्रू भागात चकमकीस सुरुवात झाली होती. सुरक्षा दल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हिज्ब-उल-मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकू याला पकडण्यासाठी मंगळवारी रात्री शोध मोहीम राबविली जात होती. बुधवारी पहाटे अवंतीपोरा भागातील शार्साली या गावात दहशवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली, यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्परतेने दहशतवाद्यांना गोळ्या झाडून ठार केले. Handwara Encounter: लश्कर ए-तैयबा चा टॉप कमांडर 'हैदर' चा खात्मा; भारतीय सैन्याला मोठे यश

हिंदुस्थान टाइम्स च्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल यांच्यातर्फे आता बेगपोरा गुलजापोरा येथे शोध मोहीम सुरु सुरू आहे. हिज्बुलचे ऑपरेशनल चीफ रियाझ नाईकू यांचे मूळ गाव आहे, जो खो व्हॅलीत सर्वात सक्रिय कमांडर आहे त्याला शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पुलवामा येथे सुद्धा दोन ऑपरेशन सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका्याने दिली. सध्या सैन्याने घरोघरी शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ANI ट्विट

मागील दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. काश्मीरच्या पुलवामा येथे, त्यांनंतर हंदवाडा येथे तर काल बलगाम येथे दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले होते दरम्यान, हंडवारा येथे दोन स्वतंत्र चकमकीत सैन्याच्या 21 राष्ट्रीय रायफलच्या कमांडिंग ऑफिसर आशुतोष शर्मा यांच्यासह सुरक्षा दलाचे 8 जवान शहीद झाले होते. तर 7 दहशतवाद्यांना जखमी आणि एकाला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.