पुलवामा येथील दहशतवादी चकमकीत दशहतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश, पण जवान शहीद
Indian Army (Photo Credits-Twitter)

जम्मू काश्मीर(Jammu Kashmir)येथील पुलवामा(Pulwama)मध्ये मंगळवारी(12 फेब्रुवारी)दहशतवादी चमकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्याय लष्कराला यश आले आहे. पण एक जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त समोर येत आहे. तसेच अन्य जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथे सुरु असलेल्या दहशतविरोधी मोहिमेत लष्करी सैन्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करत हल्ला करण्यात आला. तसेच जैश-ए-मोहम्मद संघटनेतील हे दहशतवादी असल्याचे माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार अभियान राबवत त्यांचा तपास सुरु करण्यात आला होता. मात्र स्थानिक लोकांकडून या चमकीत दगडफेक करुन अडथला आणला जात होता.

चकमकीत जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच रविवारी झालेल्या दहशतवादी चकमकीत जवानांना हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते.