Indian Army (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांचे हल्ले सातत्याने सुरुच आहेत. या हल्ल्यांना सुरक्षारक्षकांकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या बारामूला (Baramulla) मधील येडीपोरा पट्टन (Yedipora Pattan) भागात दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात आज पुन्हा एकदा चकमक सुरु झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले. (जम्मू काश्मीर: बारामुल्ला येथे सैन्याच्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड फेकला, सहा नागरिक जखमी, पहा फोटो)

एएनआय वृत्तसंस्थेने जम्मू काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बारामूला येथील यदीपोरा पट्टन येथे एनकाऊंटर सुरु आहे. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. यात एक सेना अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

ANI Tweet:

यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी बारामूला येथे लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला झाला होता. यात 6 नागरिक जमखी झाले होते. या हल्ल्यापूर्वी सोपोर भागात पोलिस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.