जम्मू काश्मीर: बारामुल्ला येथे सैन्याच्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड फेकला, सहा नागरिक जखमी, पहा फोटो
Jammu Kashmir Baramulla Grenade Attack (Photo Credits: ANI)

जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) येथील बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीवर एक ग्रेनेड फेकल्याची घटना आज, सोमवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी घ घडली. सुदैवाने यावेळी, नेम चुकुन लष्कराची गाडी सुरक्षित रित्या पुढे निघुन गेली मात्र हा बॉम्ब रस्त्यावर फुटला आणि त्यातच सहा नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात पोलिस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केल्याच्या एक दिवसानंतर हा हल्ला झाला. काल झालेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही सुदैवाने आजही एकही जीवितहानी झालेला नाही. गुजरात मध्ये NIA कडून ISI एजेंटला अटक, सैन्याच्या कामाची गुप्तहेरी करण्याचा आरोप

दहशतवाद्यांनी आज बारामुल्ला येथे भारतीय लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. परंतु ग्रेनेडचा नेम चुकला आणि रस्त्यावर स्फोट झाला आणि घटनास्थळी उपस्थित सहा नागरिक जखमी झाले, अशी अधिकृत माहिती जम्मू काश्मीर पोलिसांंकडुन देण्यात आली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, शनिवारी सुद्धा श्रीनगरमधील (Srinagar) पांथा चौकात (Pantha Chowk) रात्री भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, यात सैनिकांंनी 3 दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला होता. यात एक पोलिस कर्मचारी सुद्धा शहीद झाले होते. यानंंतर सलग तिसर्‍या दिवशी आज जम्मू आणि काश्मीर मध्ये हल्ला झाला आहे.