terrorists attack CRPF road opening party in Pulwama (Photo Credits: ANI/Deferred Visuals)

जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये पंपोर बायापास (Pampore Bypass) जवळ भारताच्या सीआरपीएफ जवानांवर (CRPF Jawans) आज (5 ऑक्टोबर) पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये 5 जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याने ते शहीद झाले आहेत तर अन्य 3 जणांवर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रोड ओपनिंग पार्टीजवळ सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. Pulwama Encounter: पुलवामाच्या झाडोरा भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर एका सैनिकाचा मृत्यू

मीडीया रिपोर्ट्सनुसार आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे. जखमी सीआरपीएफ जवानांना तात्काळ नजीकच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवानांसोबतच जम्मू कश्मीर पोलिस पंपोर मध्ये Kandijhal Bridge वर रोड ओपनिंग़ ड्युटी करत होते तेव्हा हा हल्ला करण्यात आला आहे.

ANI Tweet

आज दुपारी हल्ला झाल्यानंतर तात्काळ सारा परिसर बंद करण्यात आला आहे. तर हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे.

दरम्यान आज सकाळीच वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरियायांनी मीडियाला माहिती देताना भारतीय लष्कर दोन्ही फ्रंटवर म्हणजेच चीनआणि  पाकिस्तान दोघांचाही मुकाबला करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे.