ITR Filing Deadline Extended: आर्थिक वर्ष 2019-20 च्या ITR रिटर्न भरण्याच्या अवधीत पुन्हा एकदा वाढ; 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत रिटर्न फायलिंग करण्याची मुभा
Income Tax Department | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात करदात्यांसाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने आज आर्थिक वर्ष 2019-20 च्या ITR रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 च्या ITR रिटर्न भरण्यासाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ITR रिटर्न भरण्यासाठी अवधी वाढवण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मे महिन्यात केली होती. परंतु, सध्याच्या कठीण काळ लक्षात घेत ही मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. (Aadhaar-PAN Card लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मूदतवाढ; जाणून घ्या आधार-पॅन लिंक करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत)

सध्याच्या कठीण काळ लक्षात घेत आम्ही आयकर भरण्याचा अवधी पुन्हा एकदा वाढवला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटी रिटर्न भरण्यासाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींची आखणी करणे अधिक सुकर होईल. असे ट्विट आयकर विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी मे महिन्यात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक वर्ष 2019-20 चे कर भरण्याची तारीख 31 जुलै पर्यंत वाढण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ही मुदत वाढवून 31 ऑक्टोबर 2020 करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा यात मुदतवाढ मिळाल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे करदाते 30 नोव्हेंबर पर्यंत आयटी रिटर्न फायलिंग करु शकतात.

ANI Tweet:

दरम्यान कोरोना व्हायरसचे संकट अद्याप टळलेले नाही. देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 648315 वर पोहचला आहे. त्यापैकी 235433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 394227 रुग्ण कोरोनामुक्त आहेत. तर 18655 रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत.