आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhaar-PAN Card Link) करण्याची मूदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 ही होती. परंतु, कोविड-19 संकटामुळे आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी अधिक कालावधीची मुभा देण्यात आली आहे. इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्यासाठी करदात्यांचे आधार-पॅन कार्ड एकमेकांना लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जाणून घेऊया पॅन-आधार लिंक करण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग...
आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक करण्यासाठी 56161 किंवा 567678 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज करा. यासाठी UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN> असा मेसेज करा. उदा. तुमचा आधार कार्ड नंबर 586738291086 असेल आणि पॅन कार्ड नंबर KBJH11234M असेल. तर मेसेज UIDPAN 586738291086 KBJH11234M असा टाईप करा आणि मेसेज 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा. (ITR Filing Deadlines Extended: कोरोना व्हायरस संकट काळात सरकारकडून दिलासा; आधार-पॅन लिंक करण्याची व आय-टी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नव्या तारखा)
# ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.
# त्यातील 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.
# तिथे पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.
# एकदा सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर क्लिक करुन सब्मिट बटण दाबा.
सेंट्रल डायरेक्ट टॅक्सेशन बोर्डानुसार, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना पॅन-आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सरकारने 2018-19 वर्षाचे इन्कम टॅक्स फायलिंग करण्याची मूदत ही 31 जुलै 2020 पर्यंत वाढवली आहे. तसंच यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे आर्थिक वर्ष 2019-20 चे आयटीआर ची मूदत ही वाढवून 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.