जर तुम्ही इन्कम टॅक्स फाइल करणार असाल तर ही तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे. कारण सरकार आता लवकरच आयटी रिटर्न मध्ये मोठा बदल आहे. त्यानुसार 1 लाख रुपयापर्यंचे वीज बिल भरण्याऱ्या टॅक्स करदात्यांना आता आयकर रिटर्न फॉर्म 1 सहज भरता येणार नाही आहे. याशिवाय संयुक्त मालकी असलेले करदाता पुढील आर्थिक वर्षासाठी आयटीआर -1 किंवा आयटीआर -4 मध्ये परतावा दाखल करू शकणार नाहीत.
तर अजून एका नियमात बदल करण्यात आला असून बँक खात्यात 1 करोड रुपये जमा करणाऱ्या, विदेश यात्रेवर 2 लाख रुपये खर्च करणाऱ्यांना करदात्यांना यावेळी ITR-1 चा वापर करता येणार नाही आहे. अशा लोकांसाठी नव्या फॉर्म बाबत माहिती येत्या काही दिवसात देण्यात येणार आहे. तर अशा करदात्यांनी दुसऱ्या फॉर्मच्या माध्यमातून रिटर्न फाइल करावे लागणार आहे.(Aadhar Card New Rule: आय-टी रिटर्न भरताना चुकीचा आधार तपशील दिल्यास होणार 10,000 रुपयांचा दंड)
कोणासाठी आहे ITR-1 फॉर्म?
ITR-1 फॉर्मच्या माध्यमातून रिटर्न फाइल करणे सोपे होणार आहे. ज्या व्यक्तींची वर्षभराची कमाई 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना या फॉर्मचा फायदा घेता येणार आहे. तर ITR-4 सुगम फॉर्म HUF आणि कंपन्यांसाठी आहे. ज्या व्यक्तींचा बिझनेस किंवा एखाद्या प्रोफेशन मधून मिळाऱ्या पैशांवर भरावा लागणाऱ्या टॅक्ससाठी हा फॉर्म वापरला जातो. मात्र हा फॉर्म भरण्यासाठी व्यक्तीची वर्षभराची कमाई 50 लाखांपेक्षा कमी असवी. नव्या नोटिसनुसार, आयटीआर फॉर्मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जर एखादा करदाता घराच्या प्रॉपर्टीमध्ये संयुक्त मालकी हक्क दाखवत असेल तर त्याला ITR-1 आणि ITR-4 भरावा लागणार आहे.