
आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावरुन एकावेळी महिन्यात फक्त 6 तिकिटे बुकिंग करता येणार आहेत. परंतु सहापेक्षा जास्त तिकिटे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुम्हाला 12 तिकिटांसाठी बुकिंग करता येणार आहे. तर एका महिन्यात 6 तिकिटे बुकिंग केल्यास पडताळणी केली जात नाही.
तिकिट बुकिंग करताना पैसेंजर लिस्टमध्ये आधार कार्ड लिंक केल्याची माहितीसुद्धा लिंक करावी लागणार आहे. तसेच याबद्दल अधिक माहिती तुम्हाला आयआरसीटीच्या संकेतस्थळावर मिळणार आहे.(हेही वाचा-आयआरसीटी कडून प्रवाशांना खुशखबर! 49 पैशात मिळणार 10 लाख रुपयांचा विमा)
- आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे, त्यानंतर My Account Section मध्ये जाऊन आधार कार्ड सोबत लिंक करण्याचे ऑप्शन दिसेल.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला आधार कार्डवर दिलेल्या नावाप्रमाणे तुमच्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आधाकृर कार्ड क्रमांकसुद्धा लिहावा.
-चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर ओटीपीवर क्लिक करावे.
-त्यानंतर मोबाईलवर ओटीपी आल्यावर तो तेथे पोस्ट करा.
-तुमच्या आधार कार्डवरील सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध झाल्यानंतर अपडेट बटणावर क्लिक करावे.
-तर पुन्हा एकदा तुम्हाला लॉगिन करायचे असल्यास संकेतस्थळाला भेट देऊन माय अकाउंट येथे तुमचे नाव आणि पासवर्ड पोस्ट करुन लॉगिन करा.
प्रवाशांनी आयआरसीटीच्या संकेतस्थळावरुन तिकिटाचे बुकिंग केल्यास त्यांना 49 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. परंतु त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करताना विमा काढण्याचा ऑप्शन सुद्धा दाखवला जाणार आहे.