Railway | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. तर आयआरसीटीने (IRCTC) रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 49 पैशात 10 लाख रुपयांचा विमा काढता येणार असल्याची सेवा सुरु केली आहे. याबद्दल आयआरसीटीच्या संकेतस्थळावर अधिक माहिती दिली असून तेथून तिकिट खरेदी केल्यास प्रवाशांना ह्याचा लाभ घेता येणार आहे.

यापूर्वी ही सेवा प्रवाशांना मोफत दिली जात होती. परंतु आता प्रवाशांना यासाठी 49 पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तसेच प्रवाशांनी आयआरसीटीच्या संकेतस्थळावरुन तिकिटाचे बुकिंग केल्यास त्यांना 49 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. परंतु त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करताना विमा काढण्याचा ऑप्शन सुद्धा दाखवला जाणार आहे. तसेच विम्यासाठी प्रवाशांना त्यांचा मोबाईल क्रमांक रजिस्ट्रर केल्यावर याबद्दलची संपूर्ण माहिती मेसेजद्वारे मिळणार आहे.(हेही वाचा-RRB NTPC Recruitment 2019: रेल्वेत 35277 पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या कसा, कुठे कराल अर्ज?)

परंतु प्रवाशांचे तिकिट आरसी किंवा कन्फर्म असल्यास या विम्याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विम्याचा लाभ घेत असलेल्या प्रवाशाचा रेल्वे अपघतात मृत्यू झाल्यास किंवा अपगंत्व आल्यास त्याला 10 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. तर रुग्णालयातील उपचारासाठी प्रवाशाला 2 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.