Interim Budget 2019 (Photo Credits: File Photo)

Budget 2019: केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी आघाडी सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केले आहे. गोयल यांनी शेतकऱ्यांनासुद्धा मोठा दिलासा दिला आहे. त्याचसोबत लघु उद्योगधंद्यातील व्यापाऱ्यांसाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खास तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पात पियुष गोयल यांनी छोटे आणि लघु उद्योगासाठी एमएसएमई (MSME) 59 मिनिटांत 1 करोड रुपयांचे कर्जाची सुविधा लागू केली आहे. तसेच वस्तू आणि सेवांवरील कर आकारणी (GST) पंजीकृत असणार असून 1 करोड रुपयापर्यंतच्या कर्जावर 2 टक्के व्याज सबसीडी जाहीर केली आहे.(हेही वाचा-Budget 2019: महिलांना मोदी सरकारचं मोठ्ठ गिफ्ट, उज्ज्वला योजना अंतर्गत 8 करोड गॅस कनेक्शन मिळणार)

सरकारने खरेदीबाबत एमएसआय मधील हिस्सेदारीला ई-मार्केटप्लसच्या (JEAM) माध्यमातून 25 टक्के वाढवली आहे.ज्यामध्ये महिलांच्याद्वारे चालविले जाणारे एमएसएमई 3 टक्के असणार आहे. आतापर्यंत जीईएमने 17,500 करोड रुपयांपेक्षा अधिक देवाणघेवाणीचे पंजीकृत केले आहे. ज्यामुळे 25-28 टक्के बचत झाली आहे.(Budget 2019: अर्थसंकल्प सादरीकरणानंतर शेअर बाजार तेजीत; Sensex आणि Nifty वधारला)

भविष्यकाळासाठी 'या' योजना असणार

पियुष गोयल यांनी असे सांगितले आहे की, येणाऱ्या पुढील दहा वर्षांसाठी सुरु होणाऱ्या योजनांबद्दल लवकरच जाहीर करण्यात आले. येत्या आठ वर्षात 10 ट्रिलियन डॉलर अशी अर्थव्यवस्था होणार आहे.

त्याचसोबत छोटे आणि लघु उद्योगासंदर्भात ग्रामीण इंडस्ट्रीवर खास लक्ष दिले जाणार आहे. तसेच मनगेराला जास्तीत जास्त पैसा देऊ करण्यात येणार आहे. तर एक लाख गाव डिजिटल बनविण्याचे यशस्वी प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या वर्षात 34 करोड जन-धन खाती उघडण्यात आली.