शेअर बाजार (Photo Credits: PTI)

Budget 2019: अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सूचकांक सेन्सेक्समध्ये 370.21 अंकांनी वाढ झाली असून तो 36,626.90 वर तर निफ्टी 139.15 अंकांच्या वाढीसह 10,970.10 वर व्यवहार करत आहे.

मोदी सरकारच्या या शेवटच्या बजेटवर अनेकजण सकारात्मक प्रतिक्रीया देत आहेत. टॅक्स सूटची मर्यादा वाढवण्यात आल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर किसान सन्मान निधीमुळे शेतकरीवर्ग खुशीत आहे. (अंतरिम बजेट च्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स ,निफ्टी वधारला)

मुंबईच्या शेअर बाजारामध्ये 30 शेअर्सवर सेन्सेक्स इंडेक्स सकाळी 55.05 अंकांच्या वाढीसह 36,311.74 वर तर देशाच्या शेअर बाजारामध्ये 50 शेअर्सवर नेफ्टीत 20.4 अंकांच्या वाढीसह 10,851.35 वर उघडला.