Budget 2019: मागील काही दिवसांपासून गटांगळ्या घालत सेन्सेक्स (Sensex) आज थोडा पुन्हा तेजीमध्ये दिसला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2019) पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात तेजी दिसली आहे. आज दिवस अखेर सेन्सेक्स (Sensex) 36,256.69 अंकांवर बंद झाला आहे. तर निफ्टी (Nifty) 10,830 या अंकावर बंद झाली आहे. आज सेन्सेक्समध्ये 665.44 अंकांची वाढ झाल्याचं तर निफ्टीमध्ये सुमारे 179.15 अंकांची वाढ दिसून आली आहे.
उद्या 1 फेब्रुवारी 2019 दिवशी 2019 सालचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जाईल. लोकसभेच्या निवडणुका नजीक असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम बजेट (Interim Budget 2019) म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प असेल असे जाहीर करण्यात आले आहे. Interim Budget म्हणजे काय? कसा तयार केला जातो भारताचा अर्थसंकल्प?
अंतरिम बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रासोबतच मध्यमवर्यीगांना दिलासा देणार्या काही घोषणा सरकारकडून केल्या जातील अशी माहिती आहे. नोकरदार वर्गाचं प्रमुख लक्ष्य हे अर्थसंकल्पातील कररचनेमध्ये किती बदल होणार याकडे असेल. आजपासून अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. उद्याच्या अंतरीम बजेटबाबत आशादायी वातावरण असल्याने शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?
डॉलरच्या तुलनेत रूपया 26 पैशांनी सुधारला आहे. परिणामी एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, कोटक महिंद्रा, बजाज ऑटो आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.