Budget 2019: महिलांना मोदी सरकारचं मोठ्ठ गिफ्ट, उज्ज्वला योजना अंतर्गत 8 करोड गॅस कनेक्शन मिळणार
पंतप्रधान उज्ज्वला योजना (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Budget 2019: मोदी सरकार कडून आज (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केले जात आहे. त्यामुळे महिलांना मोदी सरकारने मोठ्ठ गिफ्ट दिले असून पंतप्रधान उज्ज्वला योजने (PM Ujjwala Yojana)अंतर्गत 8 करोड गॅस कनेक्शन देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत गर्भवती महिलांसाठी पीएम मातृ योजना सुरु करण्यात येणार आहे. तसेच कामगाराचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 2.5 लाख रुपयांऐवजी 6 लाख रुपये परिवाराला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली असून आता 20 लाख रुपये मिळणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत देशातील प्रत्येक परिवारासाठी उत्तम कुकिंग सुविधा मिळणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. तसेच उज्ज्वला योजनेबाबत प्रशंसा करत ही योजना यशस्वी झाली असल्याचे म्हटले आहे.

आगामी निवडणुकीसाठी खासकरुन महिलांचे मोदी सरकार सादर करणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. गेल्या वर्षी सरकारने अर्थसंकल्पात महिलांवर जास्त भर दिला होता. परंतु यावेळी महिलांना खास जागा मिळाली नाही. संपूर्ण देशाचे लक्ष यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे लागून राहिले होते.(हेही वाचा-Budget 2019: शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दिलासा, 6 हजार रुपये प्रतिवर्षी खात्यात जमा होणार)

अर्थसंकल्प 2018 दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 करोड महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार असल्याचे जाहीर केले होते. तत्पूर्वी 5 करोड महिलांनाच या योजनेची सुविधा देऊ करण्याचे लक्ष ठरविले होते. त्याचसोबत सरकारने महिला स्वयंसेवा समूहासाठी 75,000 करोड रुपये आणि राष्ट्रीय ग्रामीण अजीविका मिशन मधील रक्कम वाढवून 5 हजार करोड रुपयांपेक्षा जास्त मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते.