Budget 2019: शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दिलासा, 6 हजार रुपये प्रतिवर्षी खात्यात जमा होणार
Income of farmers | (Photo courtesy: Archived, Edited Images)

Budget 2019: शेतकऱ्यांना आज (1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मोदी सरकराने ज्या शेतकऱ्यांची जमिन 2 सेक्टर असणार आहे त्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करत पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले की, 1 डिसेंबर 2018 पासून ही रक्कम शेतऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी असे ही सांगितले की, या योजनेमुळे 12 करोड शेतकऱ्यांच्या परिवाराला फायदा होणार आहे. त्याचसोबत या योजनेसाठी सरकारला 75 हजार करोड रुपये खर्च करावे लागणार असून संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. (हेही वाचा-Budget 2019 Live News Updates: सरकारच्या भविष्यातील दहा योजनांचे अर्थसंकल्पात पियुष गोयल यांनी केले सुतोवाच;  कोणत्या आहेत त्या योजना? घ्या जाणून )

ग्रामीण भागात रोजगारावर मुद्द्यावर विशेष भर

मोदी सरकारने अर्थसंकल्प 2019-20 अनुसार रोजगारावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पियुष गोयल यांनी पुढील अर्थसंकल्पीय वर्षासाठी 60,000 करोड रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पूर्वीच्या अर्थसंकल्पापेक्षा 9 टक्क्यांनी हा निधी अधिक असणार आहे. तर गरज भासल्यास ही रक्कम वाढवली जाणार आहे.

गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी 55,000 करोड रुपयांचा निधी मंजुर केला होता. तर 2017-18 मध्ये या योजनेसाठी 48,000 करोड रुपये देण्यात आले. रोजगार निधी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना एका वर्षाच्या आतमध्ये 100 दिवसांचा रोजगार मिळेल असे आश्वासन दिले जाते.