Instant Grocery Delivery: आता 'ड्रोन'च्या सहाय्याने डिलिव्हर होणार किराणा सामान; Swiggy सुरु करत पायलट प्रोजेक्ट
Drone | Wikimedia Commons(Representational Photo)

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने (Swiggy) आपल्या डिलिव्हरी सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी ड्रोनचा (Drone) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले आहे की, ते लवकरच त्यांच्या इन्स्टंट किराणा डिलिव्हरी सेवा 'इन्स्टामार्ट' साठी ड्रोन वापरण्यास सुरुवात करतील. याद्वारे स्विगी त्यांची डिलिव्हरी सिस्टीम अपग्रेड करत आहे. सध्या ड्रोनद्वारे माल फक्त वितरण केंद्रापर्यंत पोहोचवला जात आहे,.

या नवीन प्रकल्पासाठी स्विगीने गरुड एरोस्पेससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत स्विगीने ड्रोन वितरण सेवेची चाचणी सुरू केली आहे. या अंतर्गत, ड्रोनद्वारे वितरणाचे काम प्रथम दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूमध्ये केले जाईल. ड्रोन डिलिव्हरी सेवेच्या साहाय्याने विना विलंब खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे काम स्विगी करणार आहे. यामुळे रायडर्स फूड पार्सलमध्ये छेडछाड करू शकणार नाहीत. तसेच सामानाची योग्य स्वच्छता राखण्यास मदत मिळेल. या सेवेमुळे अन्न वितरणाचा खर्च कमी होण्यास मदत होईल.

ड्रोन डिलिव्हरी फूड सर्व्हिस हा पायलट प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास लवकरच किराणा माल पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत डाळ, तांदूळ आणि इतर वस्तू तुमच्या घरी ड्रोनद्वारे पोहोचवल्या जातील. हा पायलट प्रोजेक्ट स्विगीच्या किराणा वितरण सेवा Instamart मध्ये ड्रोन वापरण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करेल. (हेही वाचा: LIC IPO GMP: एलआयसी चा ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? घ्या जाणून)

दरम्यान, सध्या, कंपनीचे सरासरी मूल्य $250 दशलक्ष आहे. गरुडा एरोस्पेस ही भारतातील सर्वात मोठी ड्रोन स्टार्ट कंपनीअप आहे. कंपनी 2024 सालापर्यंत एक लाखाहून अधिक स्वदेशी ड्रोन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच गुडगाव आणि चेन्‍नईमध्‍ये गरुड एरोस्पेस निर्मिती सुविधांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गरुड एरोस्पेस किसान ड्रोन यात्रेच्या शुभारंभाच्या वेळी 100 गावात एकाच वेळी 100 ड्रोन उडवण्यात आले होते.