LIC | (File Photo)

लाईफ इंशॉरन्स कंपनी (Life Insurance Corporation) बाजारामध्ये आपले आयपीओ दाखल करण्यासाठी सज्ज झाली आहे. एलआयसीचे आयपीओ सामान्यांसाठी 4 मे ते 9 मे पर्यंत खुले राहणार आहेत. या बहुप्रतिक्षित आयपीओची किंमत 902-949 या प्राईज बॅन्ड मध्ये ठेवण्यात आली आहे. आर्थिक बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणार्‍यांच्या मते आज एलआयसीच्या शेअरची ग्रे मार्केट मधील अर्थात जीएमपी मधील किंमत 75 रूपये झाली आहे.

ग्रे मार्केट काय असते?

ग्रे मार्केट म्हणजे एक अनौपचारिक प्लॅटफॉर्म आहे यामध्ये त्यांचे IPO जाहीर केलेल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री केली जाते. जरी हे लीगल व्यासपीठ नसले तरीही यावर कोणताही व्यवहार गुंतवणूकदाराच्या जोखमीवर केला जातो. तसेच, कंपनीच्या स्टॉकचे ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) देखील आगामी IPO ची मागणी किंवा लोकप्रियता दाखवते.

सरकार LIC मधील 3.5 टक्के हिस्सा किंवा 22.13 कोटी शेअर्स विकत आहे. यासह सरकार 20,557.23 कोटी रुपये जमा करेल. मात्र, ही रक्कम आधीच्या 60,000 च्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. त्याची सूची 17 मे 2022 रोजी होईल.

DIPAM चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, एलआयसीची यादी करणे हा सरकारच्या दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोनाचा एक भाग आहे. बाजारातील वातावरण लक्षात घेता हा (LIC IPO) योग्य आकाराचा असल्याचे पांडे यांनी 27 एप्रिल रोजी सांगितले होते.

LIC सारख्या मोठ्या कंपनीसाठी, आम्हाला किमान सार्वजनिक भागीदारी निकषावर सेबी आणि आर्थिक व्यवहार विभागाशी चर्चा करावी लागेल, असेही पांडे म्हणाले. दरम्यान हे सोपे नाही याची माहिती देखील पांडे यांनी दिली आहे.