Coronavirus Update: भारतात कोरोना संक्रमितांची संख्या 40 लाखांच्या पार; 86,432 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची संख्या 40,23,179 वर
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, देशाता कोरोना संक्रमितांच्या (COVID-19 Positive) एकूण संख्येने 40 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 86,432 नवे रुग्ण आढळले असून 1089 रुग्ण दगावले आहेत. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 40 लाख 23 हजार 179 वर पोहोचली असून 69,561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून ही संख्या देशातील कोरोनाची गंभीर स्थिती दर्शवित आहे. देशात सद्य घडीला 8,46,395 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 31,07,223 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 8,63,062 वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 6,25,773 जणांची प्रकृती सुधारली असून 2,10,978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचसोबत आतापर्यंत 25,964 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपली जीव गमावला आहे. Coronavirus Vaccine Latest Update: कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स

दरम्यान अमेरिकेमध्ये Novavax च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीचे परिणाम सुरूवातीच्या टप्प्यातील परिणाम समाधान असल्याची माहिती समोर येत आहे. NVX-CoV2373, या लसीमध्ये SARS-CoV-2 या कोविड 19 ची लागण करणार्‍या व्हायरसचे जेनेटिक सिक्वेन्स सोबत इंजिनियरिंग करून लस बनवण्यात आली आहे. दरम्यान शरीरात अ‍ॅन्टिबॉडीज तयार करण्यासाठी, संसर्गाचा सामना करण्यासाठी कोरोना व्हायरसच्या प्रोटीन्सचा समावेश करण्यात आला आहे.