शीतल महाजन ( Photo Credit: Facebook )

अमेरिकेत शिकागोमध्ये भारतीय पॅराजॅम्पर शीतल महाजनने 13 हजार फूटावरून उडी मारून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शीतलने तिचा हा खास व्हिडिओ फेसबूकच्या माध्यमातून शेअर केला आहे. 17 सप्टेंबर 2018 म्हणजे यंदा नरेंद्र मोदींचा 68वा वाढदिवस होता. या गोष्टीसाठी शीतल मागील 4 वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.

शीतल महाजनने शेअर केलेल्या मेसेजनुसार, शीतल मागील 4 वर्षांपासून नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी प्रयत्न करत होती, मात्र त्यांच्या कार्यालयातून कोणताच फोन आला नाही. यंदा मोदींना हटके स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर काही उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. यंदा नरेंद्र मोदींनी 68वा वाढदिवस वारणसीमध्ये साजरा केला. तेथे त्यांनी काशीविश्वेश्वर मध्ये त्यांनी शिव पूजा केली.

 

कोण आहे शीतल महाजन?

शीतल महाजन पद्मश्री विजेती आहे. राष्ट्रीय स्तरावर स्कायडाईव्हिंग क्षेत्रामध्ये शीतलने विक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही शीतलने विश्वविक्रम रचला आहे. तिने 704 उड्या मारल्या आहेत. शीतलचा देशा-परदेशात सन्मान झाला आहे. काही महिन्यांपूर्वी शीतलने नववारी साडी नेसून थायलंडमध्ये 13 हजार फीट वरून उडी मारली आहे. शीतलला दोन जुळी मुलं देखील आहे.