विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही सामानाच्या वजनावर श्रेणीनुसार मर्यादा
Indian Railway (Photo Credits-Twitter)

विमान प्रवासाप्रमाणे आता रेल्वेतही सामानाच्या वजनावर मर्यादा घालण्यात आली आहे. याबद्दल भारतीय रेल्वेने नवा नियम लागू केला आहे. विमानाने प्रवास करण्यासाठी फक्त 35 किलो वजन प्रवासी स्वत:सोबत घेऊन जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आता रेल्वेतही 35 किलोचे वजन घेऊन गेल्यास शुल्क आकारण्यात येणार नाही आहे.

रेल्वेच्या स्लीपर क्लाससाठी वजनाची मर्यादा 40 किलो ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 40 किलोच्या वरती सामानाचे वजन झाल्यास प्रवाशाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहेत. तसेच शुल्क न भरता अधिक वजनाचे सामान मिळाल्यास सहा पट अधिक शुल्काची वसूली प्रवाशाकडून करण्यात येणार आहे.

श्रेणीनुसार सामान घेऊन जाण्यासाठी नियम:

- AC प्रथम श्रेणी

विनाशुल्क सामान- 70 किलो, शुल्क देऊन सामान-150 किलो

-AC द्वितीय श्रेणी

विनाशुल्क सामान- 50 किलो, शुल्क देऊन सामान-100 किलो

-AC तृतीय श्रेणी

विनाशुल्क सामान- 40 किलो, शुल्क देऊन सामान- 40 किलो

-स्लीपर क्लास

विनाशुल्क सामान- 40 किलो, शुल्क देऊन सामान-80 किलो

-द्वितीय श्रेणी

विनाशुल्क सामान- 35 किलो, शुल्क देऊन सामान-70 किलो

(प्रवाशाने आता प्लॅटफॉर्म तिकिट काढले तरीही रेल्वेने प्रवास करता येणार)

रेल्वेनुसार एसी फर्स्ट क्लासमध्ये 15 किलो आणि अन्य श्रेणीमध्ये 10-10 किलो मार्जिनल सूट देण्यात आली आहे. या वजनापेक्षा अधिक सामान घेऊन गेल्यास सहापट अधिक शुल्क भरावे लागणार आहेत. तसेच प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास याबद्दल तक्रार टीटीईकडे करु शकता. रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे सामानाच्या वजनावर बंधन घालण्यात आले आहे.