Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

रेल्वेने प्रवास करायचे म्हणजे तिकिट असणे आवश्यक असते. तसेच तिकिट खिडकीवरील लांबलचक रांग पाहून काही प्रवासी तिकिट न काढताच रेल्वेने काही वेळेस प्रवास करतात. परंतु विनातिकिट शिवाय प्रवास केल्यात दंड भरावा लागतो. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनी तुम्ही प्रवास करणार असल्यास ऐन वेळेस तिकिट असूनही उशिर झाल्यास ती तिकिट पुन्हा वापरता येत नाही. मात्र जर तुम्ही आता फक्त प्लॅटफॉर्म तिकिट काढले असल्यास तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वे याबाबत एक नवा नियम सुरु केला असून प्लॅटफॉर्म तिकिट वापरुन प्रवासी आता रेल्वेने प्रवास करु शकणार आहेत. मात्र हे तिकिट प्रवासासाठी वापरण्यापूर्वी रेल्वे गार्डने यासाठी परवानगी दिलेले पत्र असणे आवश्यक आहे. त्याचसोबत अतिघाईच असल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिट काढून रेल्वेत चढू शकता. परंतु तुम्हाला रेल्वेच्या काही नियमांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.(1 ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन व्यवहारात झाले आहेत हे महत्वपुर्ण बदल, जाणून घ्या सविस्तर)

तसेच रेल्वेत चढल्यानंतर शक्य तितक्या लवकर टीटीई यांना याबद्दल प्रवाशांनी सांगावे. त्यानुसार तुम्हाला प्रवासाची तिकिट काढून देण्यात येईल. मात्र 250 रुपये अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. तुम्ही ज्या रेल्वेस्थानकावरुन रेल्वेत चढलात त्या ठिकाणापासूनचे तुमचे तिकिट कापले जाणार आहे. परंतु हे तिकिट तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी देऊ शकतो. मात्र आरक्षण मिळण्यासाठी हे तिकिट उपयोगी येणार नाही. तसेच एखादा व्यक्ती या तिकिटामुळे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यास आणि तो पकडला गेल्यास त्याला तुरुंगाची शिक्षा दिली जाणार आहे.