Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय रेल्वेकडून तिकिट दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागली आहे. पण दुसऱ्या बाजूला रेल्वे प्रशासनाने एक नवी सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार प्रवाशांना एका हेल्पलाईन क्रमाकांवरुन काही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तर 139 हा क्रमांक रेल्वेकडून सुरु करण्यात आला असून येथे प्रवाशांना रेल्वे गाड्यांपासून ते त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे. ही सुविधा इंटरॅक्टिव्ह व्हॉइल रिस्पॉंस सिस्टम पद्धतीची असणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 139 या क्रमांकावर फोन केल्यास सुरक्षा आणि मेडिकल इमरजेन्सी, स्वच्छता यांच्यासह अन्य गोष्टीबाबत सुविधा मिळणार आहेत. त्याचसोबत रेल्वे अपघात, भरपाई आणि भ्रष्टाचार याबद्दल सुद्धा प्रवासी या क्रमांकावर फोन करु शकतात. ही सुविधा 12 भाषांमध्ये प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(1 जानेवारी पासून RuPay कार्ड आणि UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी MDR शुल्क माफ) 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस आणि मेल गांड्याच्या (स्लीपर डब्बा) तिकीट दरात 2 पैसा प्रतिकिलोमीटर तर, एसी क्लास च्या तिकीट दरात 4 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ केली होती. मात्र, लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. भारतीय रेल्वेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वात सुरक्षित प्रदर्शन नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली होती. भारतीय रेल्वेने पहिल्या 6 महिन्यात कोणत्याही प्रवाशांचा मृत्यूची घटना घडली नाही. परंतु राष्ट्रीय वाहकांच्या सातव्या वेतन संवेदनांशी संबंधित क्रियान्वयनचे आर्थिक संकट उद्भवू लागले आहे, अशी महिती रेल्वे बोर्डाच्या चेअरमन व्हि. के यादव यांनी दिली.