Arogya Setu App Mandatory For Train Passangers (Photo Credits: File Image)

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून बंद असणारी भारतीय रेल्वे (Indian Railway) ची पॅसेंजर ट्रेन सुविधा आज 12 मे पासून काही प्रमाणात सुरु होणार आहे, नवी दिल्ली येथून देशातील विविध भागांसाठी 15 पॅसेंजर ट्रेन धावणार आहेत. यावेळी सुरक्षेसाठी प्रवाशांना अनेक नियम लागू करण्यात आले आहेत, यापैकी एक महत्वाचा नियम म्हणजे या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू मोबाईल ऍप (Arogya Setu Mobile App) वापरणं बंधनकारक असणार आहे. काल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या कॅटरिंग सुविधेबाबतही अन्य सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रवासात नागरिकांना आपापल्या खाण्यापिण्याची सोयस्वतः करावी लागणार आहे तसेच चादर, ब्लॅंकेट असे साहित्य सुद्धा आपापले घेऊन यायचे आहे. नेहमीप्रमाणे या सुविधा रेल्वेतर्फे यावेळेस पुरवल्या जाणार नाहीत.Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?

तसेच, केवळ कन्फर्म e-tickets असणारे प्रवासी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करतील याकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. प्रवासाच्या पूर्वी सर्व प्रवाशांची सक्तीने आरोग्य चाचणी केली जाईल त्यामधून कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याच प्रवाशांना गाडीमध्ये चढायची परवानगी असेल.स्टेशन आणि कोचमध्ये प्रत्येक प्रवाशाला एंट्री आणि एक्झिट पॉंईंटवर हॅन्ड सॅनिटायझर दिले जाईल. तसेच प्रवासादरम्यान मास्क परिधान करणं सक्तीचे आहे.प्रवाशांना रेल्वे सुटण्यापूर्वी 90 मिनिटं उपस्थित राहणं आवश्यक आहे. अशाही अनेक सूचना भारतीय रेल्वे तर्फे जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ऍप असणे अनिवार्य असणार आहे.

PTI ट्विट

दरम्यान, 22 मार्च पासून बंद झालेल्या भारतीय रेल्वेची सेवा आज पुन्हा सुरु होत असल्याने परराज्यात अडकलेल्या मंडळींना दिलासा मिळाला आहे. आजपासून नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी, दिब्रुगड, रांची, भुवनेश्वर, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर,बेंगळूरू, चैन्नई, तिरूअनंतपुरम या स्थानकासाठी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 रेल्वे गाड्यांच्या येणार्‍या जाणार्‍या अशा 30 फेर्‍या सुरू केल्या आहेत.