रेल्वेच्या जेवणात कोळी (Photo Credits-Twitter)

रेल्वेत खाद्यपदार्थात कीडे, अळ्या सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर आता या प्रकाराने हद्दच पार केली असून ट्वीटवर एका युजर्सने त्याला जेवणाच्या पदार्थात कोळी सापडल्याची बाब उघडकीस आणली आहे. आयआरसीटीसीकडून जी बिर्याणी विकत घेतली त्यामध्ये कोळी सापडल्याने प्रवाशाने संपात व्यक्त केला आहे. यापूर्वी सुद्धा टॉमेटो सॉस मध्ये किडे आणि डाळीत जंत सापडल्याचे समोर आले होते. शेषाद्री एक्सप्रेस मध्ये प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.

मितेश सुराना नावाच्या प्रवाशाने ट्वीटरवर ट्वीट करत असे म्हटले आहे की, आयआरसीटीसीच्या पॅन्ट्री फूड मधून खाद्यपदार्थ विकत घेतले. परंतु बिर्याणी खोलून पाहिली असता त्यामध्ये मोठा कोळी सापडल्याचे त्याने पाहिले. मितेश याने या प्रकारावर रेल्वेतच तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण दुर्लक्ष करण्यात आले. तसेच अशा प्रकाराचे जेवण अजून किती जणांना मिळाली असेल याचा विचारच करु शकत नाही.रेल्वेकडून या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यानंतर मितेश याने ट्वीटवर ट्वीट करत या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये त्याने बिर्याणीचा फोटो आणि त्यात सापडलेला कोळी हे सुद्धा दाखवून दिले आहे. त्याचसोबत आयआरसीटीसी, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सुद्धा याबाबत सांगितले आहे.(धक्कादायक! श्रीनगर मध्ये कफ सिरपमधील विषारी पदार्थामुळे 9 लहान मुलांचा मृत्यू)

यापूर्वी डेक्कन क्विन ट्रेनमध्ये जुलै 2019 मध्ये खाण्यात किडे सापडल्याचा प्रकार समोर आला होता. पुणे येथे राहणाऱ्या सागर काळे नावाच्या तरुणाने याचा खुलासा केला होता.त्यावेळी त्याने ऑमलेट मागवले असता त्यासोबत देण्यात आलेल्या सॉस मध्ये किडे असल्याचे दिसून आले होते.