धक्कादायक! श्रीनगर मध्ये कफ सिरपमधील विषारी पदार्थामुळे 9 लहान मुलांचा मृत्यू
Cough Syrup (Photo Credits: Wikimedia Commons)

लहान मुलांना साधा खोकला लागला की तातडीचा उपाय म्हणून आपण त्याला आपल्या जवळ कफ सिरप देतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेले कफ सिरप त्याच्या जीवावर बेतू शकते. श्रीनगरध्ये कफ सिरप दिल्याने त्यातील विषारी पदार्थांमुळे 9 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मूमधील ऊधमपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. Coldbest-PC असे विष आढळलेल्या कफ सिरपचे नाव आहे. TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेनंतर जवळपास 8 राज्यात या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

या कफ सिरपमध्ये विषारी पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे सिरप जवळपास 8 राज्यांतून परत मागविण्यात आले आहे. हे सिरप सिरमौर जिल्ह्यातील तयार होत असून सध्या ते बनवण्यावर बंदी घातली गेली आहे. Children Health Tips: लहान बाळाचे पहिल्यांदा कान टोचल्यावर कशी घ्याल काळजी; वाचा घरगुती टिप्स

जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक औषध नियंत्रक सुरिंदर मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हिमाचल प्रदेशातील Digital Vision नावाची औषध कंपनी बनवते. चंदीगडच्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या जिल्ह्यातील मुलांचा मृत्यू हा Coldbest-PC या कफ सिरपमधील Diethylene Glycol या विषारी पदार्थामुळे झाला आहे.

या सिरपच्या पुढील चाचणीसाठी जम्मूजवळील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन तसेच चंदीगडच्या औषध तपासणी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. यात Diethylene Glycol नावाचा विषारी पदार्थ आढळला आहे. दरम्यान अद्याप याबाबतचा अंतिम रिपोर्ट आलेला नाही.