Prime Minister Narendra Modi | (Photo Credits-ANI)

Coronavirus: दिवसागणिक हेल्थकेअर कर्मचार्‍यांंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण होत आहे. प्राप्त माहितीनुसार आजवर देशात 87 हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांंना कोरोनाची लागण झाली आहे तर दुर्दैवाने 573 जणांंचा कर्तव्य पार पाडताना मृत्यु झाला आहे. याच पार्श्वभुमीवर सर्व कर्मचार्‍यांंच्या वतीने आज इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा (IMA President Dr. Rajan Sharma) यांंनी पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंना पत्र लिहिले आहे, या पत्रात शर्मा यांंनी कोरोनामुळे हेल्थकेअर कर्मचार्‍यांवर येणारा तणाव मांंडला आहे, तसेच कोरोनाशी लढताना डॉक्टर मंंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत त्यामुळे त्यांंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आर्थिक तरतुद करावी आणि मृत्यु झालेल्या कोविड योद्धा डॉक्टरांंच्या कुटुंंबाना भरपाई दिली जावी अशी विनंंती सुद्धा केली आहे.

Chennai: कोरोना व्हायरस रुग्णावर झाली Lung Transplant शस्त्रक्रिया; आशियामधील पहिलाच प्रयोग असल्याचा MGM Healthcare चा दावा

आयएमए अध्यक्षांंनी लिहिलेल्या पत्रात, कोविड 19 शी लढताना मृत्यु झालेल्या डॉक्टरांंना शहीद म्हणुन संंबोधले जावे तसेच त्यांंच्यापाठी असणार्‍या कुटुंंबाला सरकारकडुन आर्थिक मदत दिली जावी, डॉक्टरांंची पत्नी किंंवा मुलांंना सरकारी नोकरी दिली जावी अशा ही मागण्या केल्या आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, या पत्रात डॉ.शर्मा यांंनी आपण काहीच आठवड्यात कोरोनाबाधित देशांंच्या यादीत टॉपला येऊ अशी माहिती मिळाल्याचा सुद्धा उल्लेख केला आहे. यावरुन उपाययोजना करण्यासाठी डॉक्टर सहित वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत मात्र सरकारने त्यांच्या कामाची पोचपावती देउन प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असेही या पत्रात म्हंंटले आहे.

सध्याची परिस्थीती पाहता, देशात कोरोना रुग्णांचा आकडा हा 35,42,734 वर पोहचला आहे. मात्र यातील 27 लाखाहुनही अधिक रुग्ण हे ठिक झाले आहेत, तसेच सध्या कोरोना मृतांंचा टक्का खाली येउन 1.79 % वर पोहचला आहे.त्यामुळे परिस्थिती नियंंत्रणात असल्याचे म्हंंटले जात आहे.