प्रतिकात्मक फोटो (PC - You Tube)

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कारण आता लवकरच विमानातून प्रवास करताना प्रवाशांना फेसबुक, ट्वीटर सारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने भारतातून उड्डाण होणाऱ्या विमानात वाय-फाय सेवा देण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारने एका अधिकारिक अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की, उड्डाणादरम्यान जेव्हा लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टवॉच,ई-रीडर किंवा अन्य कोणतेही उपकरण फ्लाइड मोडवर असल्यास विमानातील प्रवाशांना वायफायचा वापर करुन इंटरनेटचा वापर करता येणार आहे.

यापूर्वी शुक्रवारी विस्ताराचे सीईओ लेस्ली थंग यांनी एवरेट मध्ये पहिले बोइंग 787-9 विमानाच्या डिलिव्हरीवेळी असे सांगितले होते की, भारताचे हे पहिलेच विमान असून प्रवाशांना इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. तर 2018 मध्ये TRAI यांनी विमानात प्रवाशांना इंटरनेट आणि वायफायची सर्विस देण्याबाबत सांगितले होते. तेव्हा ट्रायकडून असे सांगण्यात आले होते की, या सेवा देशातील विमानात कनेक्टिव्हिटीच्या रुपात उपलब्ध करुन द्यायला हवा. ट्रायच्या या प्रस्तावानंतर गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात संशोधन ड्राफ्टमध्ये याबाबत सांगण्यात आले होते.(विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही सामानाच्या वजनावर श्रेणीनुसार मर्यादा) 

भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवाशांना इंटरनेट किंवा फोन वापरण्याची परवनगी नव्हती. त्यामुळे विमानातील प्रवाशांना त्यांचा मोबाईल बंद किंवा अॅरोप्लेन मोडवर ठेवण्याचा सांगण्यात येत. अन्य देशातून भारतात येणाऱ्या विमानांनासुद्धा हा नियम लागू होता. मात्र आता दूरसंचार विभागाकडून यावरील निर्बंध काढून टाकण्यात आले आहे.