भारतीय वायुसेनेने लॉन्च केला 'Indian Air Force: A Cut Above' स्मार्टफोन गेम; असा करा डाऊनलोड
'Indian Air Force: A Cut Above' Game (Photo Credits: Twitter)

भारतीय वायुसेनेत करिअर करण्यासाठी तरुणांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने वायुसेनेने बुधवारी (31 जुलै) मोबाईल गेम Indian Air Force: A Cut Above लॉन्च केला. वायुसेनेचे (Air Force) चीफ बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते या खास फ्लाईट सिम्युलेटर गेमचे लॉन्चिंग करण्यात आले.

हा व्हिडिओ गेम असून यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) दिसतील. याशिवाय मिग-21 पासून ते सुखोई, मिराज, एमआय-17 यांसारखे एअरक्राफ्ट देखील तुम्ही यात उडवू शकता. बालाकोट एअर स्ट्राईकची (Balakot Air Strike) झलक देखील यात पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच भारतीय वायुसेनेच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर या व्हिडिओ गेमचा टीझर लॉन्च करण्यात आला होता. पहा गेमचा टीझर

आता हा व्हिडिओ गेम सर्वांसाठी खुला झाला आहे. खाली दिलेल्या प्ले स्टोअरच्या लिंकवरुन तुम्ही हा गेम अगदी सहज डाऊनलोड करु शकता.

Download Link-

https://play.google.com/store/apps/details?id=com.threye.iaf.aca

ANI ट्विट:

आयएएफने दिलेल्या माहितीनुसार, हा सिंगल प्लेअर मोबाईल व्हिडिओ गेम असून जो अॅनरॉईड आणि आयओएस या दोन्हीही व्हर्जनवर खेळता येईल. ऑक्टोबर महिन्यापर्यंत या गेमचा मल्टीप्लेअर व्हर्जन देखील लॉन्च करण्यात येईल. हा गेम खेळल्याने एक रोमांचक अनुभव मिळेल, असा दावा आयएएफने केला आहे. तसंच खऱ्या वायुसेनेच्या वैमानिकाचा अनुभव हा गेम खेळताना अनुभवता येईल.

विशेष म्हणजे इतर फ्लाईट सिम्युलेटर गेमप्रमाणे हा गेम खेळण्यापूर्वी प्लेअर्संना ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर त्यांना फ्लाईट उडवण्याची संधी दिली जाईल. वेगवेगळ्या फायटर प्लेन्सवरुन पूर्ण केली जाणारी अनेक मिशन यात समाविष्ट आहेत. सर्व मिशन यशस्वीरित्या पार करणाऱ्या प्लेअर्संना शेवटी वायुसेनेकडून Wing देण्यात येईल.