जगभरात युके, कॅनडा, अमेरिका सह काही देशांमध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर आता भारतात देखील त्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान आज देण्यात आलेल्या माहितीमध्ये Russian Direct Investment Fund (RDF)चे CEO Kirill Dmitriev यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात या लसीचे 2021 मध्ये सुमारे 300 मिलियन डोस बनवले जातील. भारतासह जगात अन्य काही देश देखील या लसीच्या निर्मितीमध्ये सहभागी आहेत. ही लस प्रभावी आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भारतातील रशियन एम्बेसीने आज (18 डिसेंबर) माहिती देताना, रशिया आता भारतामध्ये तयार झालेल्या Sputnik V vaccine च्या नमुन्याला वापरण्यासाठी सज्ज झाले आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांच्या आहवालानुसार कोविड 19 विरूद्ध ती 95% पेक्षा अधिक प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे.
जागतिक स्तरावर मागील वर्षभरापासून कोरोनाचा थैमान सुरू आहे. या वायरसच्या विळख्यात सुमारे 75 मिलियन लोकं आली आहेत.
Russian Direct Investment Fund (RDF) CEO Kirill Dmitriev says Russia is testing the first samples of its SputnikV #COVID19 vaccine that were produced in India. 300 mn doses will be produced by India in 2021: Russian Embassy in India
— ANI (@ANI) December 18, 2020
भारतामध्ये अद्याप कोणत्याही लसीला तातडीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली नसली तरीही 3 जणांनी DCGI कडे अर्ज केला आहे. येत्या काही आठवड्यात लसीकरणाला मंजुरी मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही लसीकरणाच्या गाईडलाईंस जारी केल्या आहेत.