COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 86,498 नवे कोरोनाबाधित; 66 दिवसांमधील निच्चांकी कोविड रूग्णांचं निदान
New COVID-19 Centres (Photo Credit: Twitter)

भारतामध्ये आता कोरोना वायरसची दुसरी लाट ओसरू लागली आहे. आज (8 जून) पहिल्यांदाच देशामध्ये तब्बल 63 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखापेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 86,498 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 2123 मृत्यू नोंदवले गेले आहेत. यावेळी दिवसभरात 1,82,282 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देखील देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान आज 63 दिवसांनंतर देशात 1 लाखापेक्षा कमी कोरोनारूग्ण समोर आले आहेत तर हा मागील 66 दिवसांमधील देशातील निच्चांकी कोरोनाबाधितांच्या निदानाचा आकाडा आहे. भारतामध्ये अ‍ॅक्टिव्ह रूग्ण देखील 97,907 ने कमी झाले आहेत. सध्या भारतामध्ये13,03,702जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत. नक्की वाचा: PM Narendra Modi यांच्या 2 मोठ्या घोषणा! 18 वर्षांवरील लोकांना लस आणि दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य पुरवले जाणार, वाचा सविस्तर.

ANI Tweet

भारतामध्ये मागील दीड महिन्यात कोरोना वायरसच्या म्युटंटने धुमाकूळ घातला होता पण आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य प्रशासन आणि सरकारला यश येत असल्याचं चित्र आहे. देशामध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असली तरीही कोविड19 नियमावली देशभर पाळल्याचे आवाहन करण्यात आले आहे. यादरम्यान आता देशात कोविड 19 लसीकरणाचा देखील वेग वाढवला जात आहे. देशात 3लसी उपलब्ध असून काल पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे 18 वर्षांवरील सार्‍यांचे लसीकरण आता केंद्र सरकार करणार आहे. 21 जून पासून त्याला सुरूवात होणार आहे.