PM Narendra Modi यांच्या 2 मोठ्या घोषणा! 18 वर्षांवरील लोकांना लस आणि दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य पुरवले जाणार, वाचा सविस्तर
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

कोरोना महामारीचे जगावर आलेले संकट हे मागील 100 वर्षांतील सर्वात मोठे आणि भयंकर असे संकट आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनासंबंधातील देशातील परिस्थिती सांगत दोन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी मोफत लस (Free Corona Vaccination) आणि दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य (Free Grains) पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून 18 वर्षांवरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार त्यासाठी राज्य सरकारला मोफत लस पुरविले जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे वाढवली जाणार दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळणार असेही सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र शुल्क भरून ही लस घ्यायची असेल तर त्याची तरतूदही करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालय 150 रुपये सर्विस चार्ज घेतील असेही ते पुढे म्हणाले.हेदेखील वाचा- PM Narendra Modi Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लसीकरणाबद्दल मोठ्या घोषणेसह 'या' मुद्द्यांवर महत्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत पुढे वाढवली जाणार आहे.. या महामारीच्या काळात गरिबांच्या प्रत्येक गरजा लक्षात घेत, सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. देशातील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत 80 कोटीहून अधिक देशवासीयांना दर महिन्याला नि:शुल्क अन्नधान्य निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल. गेल्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 8 महिने मोफत धान्य नागरिकांना पुरवण्यात आलं होतं. यंदाची कोरोनाच्या संकटामुळे रोजगार बंद होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेतही मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. आता ही योजना दिवाळीपर्यंत लागू असणार आहे.त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे.