Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढताना (India Corona Cases Updates) दिसतो आहे. पाठिमागील 24 तासात तब्बल 2,68,833 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. या नव्या संक्रमितांमुळे देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 3,60,50,962 इतकी झाली आहे. पाठिमागील 24 तासात 402 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 4,85,752 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमायक्रोन (Omicron) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. पाठिमागील 24 तासात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 5.01% इतक्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात 6,041 जण कोरोना संक्रमित झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशाती एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 14,17,820 इतकी झाली आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्येचा दर 3.35% झाला आहे. तर, देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा घटला असून तो 94.83% इतका झाला आहे. दरम्यान, पाठिमागील 24 तासात देशात एकूण 1,22,684 नागरीक कोरोनामुख्त झाले आहेत. नव्याने संक्रमित होणाऱ्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात 3,49,47,390 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. (हेही वाचा, IT Jobs: आयटी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, कोरोना काळातही 'या' कंपनीला हवे आहेत नवीन 55,000 हून अधिक फ्रेशर्स)

ट्विट

देशातील दैनिक पॉझिटीव्हीट दर वाढून आता 16.66 % वर पोहोचला आहे. जो आगोर 14.7% होता. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरही वाढून आता 12.84% झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत देशभर एकूण 156.02 कोटी कोलोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.