भारत-चीन सीमा (Photo Credits: Twitter/File)

पुर्व लद्दाख येथे भारत आणि चीन दरम्यान सैनिकांमध्ये एलएसी जवळ अद्याप तणाव कायम आहे. या प्रकरणामुळे दोन्ही देशातील सैन्याच्या कमांडर यांची बैठक सुद्धा पार पडली. मात्र यावर काहीच तोडगा निघाला नाही. दुसऱ्या बाजूला भारताचा चीन वरील विश्वास उडाला असून ते लोक पाठीमागून वार करत आहेत. हेच कारण आहे की, पुर्व लद्दाख मध्ये भारताने बहुसंख्येने सेना आणि हत्यारे तैनात केली आहेत. याच पार्श्वभुमीवर दोन्ही देश प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्यानंतर आता भारतीय सेनेच्या जवानांनी एका चीनी सैनिकाला लद्दाख मधील डेचमोक येथून ताब्यात घेतले आहे.(पाकिस्तानाच्या ISI ला लढाऊ विमानांची माहिती पुरवल्याप्रकरणी Hindustan Aeronautics च्या कर्मचाऱ्याला अटक)

सुत्रांच्या मते सुरक्षा बलाने लद्दाख मधील चुमार-डेचमोत परिसरातून एका चीनी सैनिकाला पकडले आहे. त्याने अज्ञातपणे भारतीय क्षेत्रात प्रवेश केला असावा. काही नियमांनुसार त्याची चौकशी केल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे त्याला पुन्हा आपल्या देशात पाठवले जाईल. असे ही म्हटले जाते आहे की, चीनी सैनिकाकडे काही महत्वाची कागदपत्र सुद्धा मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. मात्र अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान मीडियापर्यंत करण्यात आलेले नाही.(जम्मू कश्मीर: कुलगाम मधील चिंगम भागात 2 दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांकडून कंठस्नान)

तर काही नियम आणि अटींनुसार चीनी सैनिकाची चौकशी केल्यानंतर त्याला आपल्या देशात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, चीनी सैनिक अशा वेळी पकडला गेला आहे जेव्हा पूर्व लद्दाखच्या सीमेवरील वाद सोडवण्यासाठी आठव्या वेळेस चर्चा होणार होती. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या बैठका विफल ठरल्या होत्या. यापूर्वी भारत आणि चीन सेनेचे कमांडर यांची बैठक 12 ऑक्टोंबरला चुलूस येथे पार पडली होती. पण त्यावेळी काहीच तोडगा निघाला नाही.