काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day 2022 शुभेच्छा दिल्या आहेत. भारती स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतो आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, भारताने पाठिमाच्या 75 वर्षांमध्ये आपल्या कठोर मेहनत आणि प्रतिभाशाली भारतीय नागरिकांच्या जोरावर शिक्षण,विज्ञान आणि माहिती क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. या प्रगतित्या जोरावर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही नेत्रदिपक काम केले आहे. भारताने आपल्या दूरदर्शी नेत्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र आणि निष्पक्षाती पारदर्शी निवडणूक व्यवस्था प्रस्तापीत केली. सार्वजनिक संस्था आणि घटनात्मक संस्थांनाही मजबूत बनवले. यासोबतच भारत विविधतेत एकता दाखवणारा सर्वात मोठा लोकशाही देश ठरला.
सोनिया गांधी यांनी म्हटले की, आम्ही पाठिमागच्या 75 वर्षांमध्ये मोठी कामगिरी केली. आलेल्या आव्हानांचा संधी म्हणून स्वीकार केला. ज्यामुळे भारत विकासाच्या मार्गावर वाटचाल करु शकला. मात्र, आमच्या देशातील आत्ममग्न सरकार आज देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या महान बलिदान आणि देशातील गौरवशाली परंपरांनाच तुच्छ समजालयाल लागली आहे. जे कदापीही स्वाकारार्ह नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक सत्यासोबत छेडछाड, चुकीची वक्तव्ये तथा गांधी नेहरु पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना खोट्या घटनांच्या आधारे आरोपाच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रयत्नांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोठ्या प्रमाणावर विरोध करेल. पुन्हा सर्व देशवासियांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि भारताची उज्ज्वल लोकशाही कायम राहिली ही अपेक्षा करते. (हेही वाचा, Independence Day 2022: आपल्या मातीत खूप सामर्थ्य असून भारताचा 75 वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे - पंतप्रधान मोदी)
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरस संक्रमित झाल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोमवारी पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियंका गांधी वाद्रा आणि राहुल गांधी हे सुद्धा क्वारंटनाईन आहेत. प्रियंका गांधी कोरोना संक्रमित असल्याची माहिती त्यांनी 10 ऑगस्टपासून कोरोना संक्रमित असल्याची माहिती दिली होती. त्या आधी तिनच दिवसांपूर्वी सोनिया गांधी संक्रमित झाल्याचे वृत्त आले होते.