Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण भारतात कोरोना व्हायरस विषाणूने हैदोस घातला असून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे. भारतातील 6412 रुग्णांपैकी 5706 रुग्णांवर उपचार सुरु असून 504 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील 12 तासांत भारतात 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून ही स्थिती गंभीर बनत चालली आहे. या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व वैदयकिय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारकडून 15,000 कोटी रुपयांचे आपत्कालीन पॅकेज; अनेक राज्यांना मिळणार आर्थिक मदत

तर महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत (Mumbai) आज कोरोना विषाणू संक्रमणाची 79 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 775 झाली आहे.

कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी सरकारने गुरुवारी विशेष पॅकेज (Emergency Health Package) जाहीर केले आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी 15000 कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी केंद्र सरकार संपूर्ण खर्च करणार आहे.