लसीचे प्रतिकूल परिणाम झाल्यास उत्पादकांना सरकारने खटल्यांपासून संरक्षण द्यावे- अदर पूनावाला
SII CEO Adar Poonawalla | (Photo Credits: ANI)

लसीचे (Vaccine) प्रतिकूल परिणाम झाल्यास लस उत्पादकांना सरकारने खटल्यांपासून संरक्षण द्यावे, असे सीरम इंस्टीट्यूड ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी म्हटले आहे. सीरम इंस्टीट्यूड ऑफ इंडिया भारतात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (Oxford-AstraZeneca) च्या लसीचे उत्पादन करत आहे. कोविशिल्ड (Covishield) या नावाने ही लस ओळखली जाते. कायद्याच्या भीतीमुळे कोविड-19 चे लस उत्पादक कंगाल होऊ शकतात, असे लसीच्या परिणांबद्दल चर्चा करत असताना अदर पूनावाला म्हणाले.

सरकारने सर्व लस उत्पादकांना खटल्यांपासून संरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. जगभरातील इतर देशांमध्ये सुद्धा लस उत्पादकांना खटल्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी चर्चा सुरु आहे. खटल्यांपासून मिळणारे संरक्षण हे कोरोना संकटकाळात अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली. (COVID-19 Vaccination in India Guidelines: भारतामध्ये कोरोना वायरस लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी भारतीयांना मिळणार लस; गाईडलाईन्स जारी)

अमेरिकेमध्ये कोविड-19 लस उत्पादकांविरुद्ध संकटकाळात कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा दावा किंवा खटला दाखल करु नये, असे अमेरिका सरकारने ठरवले आहे. जर अशा खटल्यांपासून लस उत्पादकांचे संरक्षण केले नाही तर खटल्याच्या भीतीपोटी लस उत्पादन लसीचे उत्पादन बंद करु शकतात. (भारतात लसीकरणाला जानेवारी पासून सुरुवात होण्याची शक्यता; ऑक्टोबर 2021 पर्यंत जनजीवन पूर्वपदावर येण्याचा Adar Poonawalla यांचा अंदाज)

दरम्यान, चेन्नईमधील एका स्वयंसेवकाने लसीच्या ट्रायल्स दरम्यान झालेल्या त्रासामुळे लस उत्पादकांविरुद्ध 5 कोटींची मागणी केली आहे. लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये न्यूरोलॉजिकल बदल घडून आले असा या व्यक्तीचा दावा आहे. सीरम इंस्टीट्यूने हे सर्व दावे फेटाळत त्या व्यक्तीवर मानहानीचा दावा करत 100 कोटींची मागणी केली आहे.