Representational Image (Photo Credits: PTI)

भारतामध्ये एकीकडे कोरोना संकट गंभीर असताना आता देशात अजून एका संकटाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारतात 15 मे च्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांट हे चक्रीवादळ पश्चिम किनार्‍याला धडकण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि यामधून समुद्रात Tauktae चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते.

भारतीय हवामान खात्याचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा परिणाम भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसणार आहे. यामध्ये 14 मे रात्री पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या भागांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सध्या मच्छिमारांना व बोटींना देखील परतण्यासाठी इशारे देण्यार आल्याचे सांगितले आहे. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मच्छिमार्‍यांनी देखील 12 मे च्या रात्री पर्यंत परतण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

के एस होसाळीकर ट्वीट

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, European Ensemble Prediction System ने वर्तवलेल्या अंदाजाच्या आधारे या चक्रीवादळात लॅन्डफॉल हा 17 मे दिवशी गुजरातच्या किनारपट्टीवर होऊ शकतो. सध्या चक्रीवादळाच्या पुढील प्रवासाबाबत अंदाज बांधणं हे खूपच घाईचे होईल असे M. Mohapatra या हवामान खात्याच्या director general यांनी ET सोबत बोलताना म्हटलं आहे. मात्र भारतीय हवामान खातं सध्या या चक्रीवादळाच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

यंदा भारतामध्ये 1 जूनला वेळेत मान्सून दाखल होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार 1 जूनला तो केरळमध्ये येण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.