महिला सुरक्षा हा देशातील कायमचं गंभीर प्रश्नांपैकी एक आहे. बाहेर, घरात, रस्त्यावर, कार्यस्थळी, शाळा, कॉलेज कुठेही स्त्रीया सुरक्षित नसल्याचे हजारो उदाहरण आपण ऐकतो. पण यावर गंभीर अशी कारवाई काहीही होताना दिसत नाही किंबहूना तेवढ्या पुरता काय तो त्या प्रकरणाचा उदोउदो होतो पण महिला सुरक्षेचा प्रश्न कायम ऐरणीवरचं. काही ठिकाणी पुरुष हातांनी महिलेवर अत्याचार करत नसला तर त्याच्या डोळ्यांनी, शब्दांनी कायम महिलेवर छुपा अत्याचार करतचं असतो आणि त्यामुळेचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेश ब्यूरो कडून यासारख्या घटनांवर चाप बसवण्यासाठी एक कलम अंतर्गत महिला सुरक्षिततेबाबत माहिती दिली आहे. तरी या कलमनुसार पुरुषास तब्बल तीन वर्षांची जेल किंवा मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात येवू शकतो.
कुठल्याही पुरुषाने महिलेस माल, छम्मक छल्लो, आयटम, चेटकीन, चारित्र्यहिन सारख्या शब्दांनी संबोधल्यास किंवा अश्लील हावभाव दर्शवल्यास पुरुषास IPC च्या कलम 509 अंतर्गत 3 वर्षे तुरुंगवास किंवा मोठा दंड तसेच या दोन्हीची शिक्षा होऊ शकते. पुरुषाच्या ज्या कुठल्या वागणूकीमुळे स्त्रीच्या नम्रतेचा अनादर होणार असेल त्यामुळे पुरुषास या कायद्याअंतर्गत शिक्षा होवू शकते. (हे ही वाचा:- Mumbai Shocker: मुंबईच्या शिवडी भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 65 वर्षीय Arabic Teacher ला अटक)
आवश्यक जानकारी :~
————————
यदि कोई व्यक्ति किसी स्त्री को आवरा, माल, छम्मक-छल्लो, आइटम, चुड़ैल, कलमुखी, चरित्रहीन जैसे शब्दों से संबोधित करता है या अश्लील इशारे करता है, जिससे उसके लज्जा का अनादर हो। तो उसे आईपीसी की धारा 509 के तहत 3 वर्ष तक जेल/ आर्थिक दण्ड या दोनों हो सकता है।
— NCIB Headquarters (@NCIBHQ) December 16, 2022
तरी महिला सुरक्षेसाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. केवळ महिलेचा शारिरीकचं नाही तर महिलेवर मानसिक अत्याचार होवू नये यासाठी हा कायदा आहे. यामुळे ग्रामीणसह शहरी भागात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांना चाप बसण्यास मोठी मदत होणार आहे. तर महिलांनी देखील पुरुषांचे या प्रकराचे वक्तव्य निमूटपणे ऐकून न घेता त्या बाबत तत्काळ पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन राष्ट्रीय गुन्हे अन्वेश ब्यूरो कडून करण्यात आले आहे.