देशातील सर्वात मोठी खासगी बँक ICICI च्या ग्राहकांना येत्या पुढील महिन्यापासून मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, तर डिजिटल पद्धतीने व्यवहार होण्याच्या निर्णयामुळे झीरो बॅलेन्स (Zero Balance) खाते धारकांसाठी असे शुल्क आकारण्यात येणार आहे की त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
जर तुमचे आयसीआयसीआय बँकेत झीरो बॅलेन्स अकाउंट असल्यास तुम्हाला आता पैसे काढताना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहेत. येत्या 16 सप्टेंबर पासून हा नियम झीरो बॅलेन्स धारकांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढल्यास 100-125 रुपयापर्यंत अतिरिक्त शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. तसेच ग्राहकाला हे शुल्क खात्यानुसार लागू केलेल्या अटीनुसार द्यावे लागणार आहेत.
त्याचसोबत कॅश मशीनच्या माध्यमातून जरी पैसे भरल्यास त्यावर सुद्धा अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीआयसीआयने शुक्रवारी रात्री एक नोटीस जाहीर करत असे म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यासाठी उत्साहित करत आहोत. तसेच मोबाईल बँकिंच्या माध्यमातून होणारे NEFT, RTGS आणि UPI व्यवहारांवर लावण्यात आलेले अतिरिक्त शुल्क काढून टाकण्यात आले आहेत.(आधार कार्डवरील 'या' गोष्टींबाबत अपडेटसाठी आता कागदपत्रांची गरज भासणार नाही)
बँकेतून 10,000 ते 10 लाख रुपयांच्या एनइएफटी व्यवहारावर 2.25 रुपयांपासून ते 24.75 रुपयापर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागतात. तसेच आरटीजीएस व्यवहारावर 20 रुपयांपासून ते 45 रुपयापर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागतात.