
Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांना खुले आव्हान दिले आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना रामलल्लाच्या दर्शनाची परवानगी देणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात काम करणाऱ्या उत्तर भारतीयांना मारहाण करायचे आणि काँग्रेस राज ठाकरेंना सुरक्षा पुरवत असे.'
बृजभूषण काय म्हणाले?
उन्नाव येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या होळी मिलन कार्यक्रमात माजी भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांनी हजेरी लावली. येथील कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 'माजी खासदार हा शब्द ऐकल्यावर मला खूप वाईट वाटते. मी देशाचा एक अभूतपूर्व खासदार आहे. समाजाला चालण्यास मदत करणारे पाय शूद्र म्हटले गेले आहेत. परंतु प्रत्येक माणूस जन्मतः शूद्र असतो. पण जाती कर्माने ठरवल्या जातात. (हेही वाचा -Brij Bhushan Sharan Singh Grants Regular Bail: लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर)
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर मोठा हल्लाबोल करताना बृजभूषण म्हणाले की, 'ते राम मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. पण जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना रामलल्लाच्या दर्शनाची परवानगी देणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात काम करणाऱ्या उत्तर भारतीय मजूर, गाड्या चालवणारे आणि गरीब लोकांना मारहाण करायचे. तेव्हा काँग्रेस राज ठाकरेंना सुरक्षा पुरवत होते.' (नक्की वाचा: Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, तीव्र शब्दांत टीका .)
बृजभूषण यांनी पुढे म्हटलं आहे की, 'ज्यांना रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करू. राहण्याची, जेवणाची किंवा इतर कोणत्याही समस्येची बाब असो, शक्य ती सर्व मदत केली जाईल.' तथापि, राणा सांगा यांच्याबद्दल दिलेल्या विधानावर ब्रिज भूषण म्हणाले की, सरकारने कायदा करून देशातील महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांची सुरक्षा काढून टाकावी.