Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

MBBS Student Dies By Suicide In Kota: कोटामध्ये आत्महत्या (Suicide) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोटा (Kota) येथून आणखी एक आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. राजस्थान (Rajasthan) मधील कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस विद्यार्थ्याने आत्महत्या (MBBS Student Commits Suicide) केली. तो गेल्या तीन वर्षांपासून कोटा येथे राहत होता. त्याच्याकडून एक सुसाईड नोट (Suicide Note) जप्त करण्यात आली आहे. महावीर नगरचे एएसआय मोहन लाल यांनी ही माहिती दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवागारात ठेवला. (वाचा - JEE Fail Student Dies By Suicide: 'आई-बाबा, मला माफ करा' जेईई परीक्षेत अपयश, इयत्ता आकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)

विद्यार्थ्यांच्या खोलीतून सापडली सुसाईड नोट - 

पोलिसांना मृताच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की तो त्याच्या पालकांची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. महावीर नगर सीआय रमेश कविय यांच्या मते, बस्सी येथील रहिवासी 28 वर्षीय सुनील बैरवा कोटा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करत होता. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि गळफास घेतला. बुधवारी तो आला नाही तेव्हा त्याच्यासोबत वसतिगृहात राहणाऱ्या मुलांनी रात्री त्याच्या खोलीत शोध घेतला. तेव्हा तो फासावर लटकलेला आढळला. त्यानंतर या घटनेची माहिती महावीर नगर पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवागारात ठेवला.  (हेही वाचा, JEE Aspirant: कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; बिहारमधील 16 वर्षीय विद्यार्थ्याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या)

यापूर्वी घडली अशीच घटना -

मिळालेल्या माहितीनुसार, कोटामध्ये या वर्षी आत्महत्येची ही आठवी घटना आहे. यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी कोटा येथे एका नीटच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अंकुश मीणा असे या विद्यार्थ्याचे नाव होते. 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केही होती. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, अभ्यासाचा ताण त्याच्या मृत्यूचे कारण नव्हते. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.