Representational Image (Photo Credits: Youtube Screenshot)

प्रेमात धोका मिळाल्याने तरुणाने भरपूर प्रमाणात दारु प्यायला. त्यानंतर हैदराबाद (Hyderabad) येथून चैन्नई (Chennai) येथे जाणाऱ्या दोन विमानात बॉम्ब असल्याची अफवा सर्वत्र पसरवली. तर विमानात बॉम्ब असल्याचे कळताच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र थोड्याच वेळात तरुणाने पसरवलेली अफवा खोटी असल्याचे समोर आले. या प्रकरणी तरुणाला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.

तरुणाने विमानतळाच्या संपर्क कार्यालयात फोन करत विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. त्यानुसार सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी आणि बॉम्ब निरोधक टीमकडून विमानात असलेल्या बॉम्बची शोधाशोध सुरु केली. त्यानंतर ज्या क्रमांकावरुन फोन आला होता त्याचा तपास केला असता फेक कॉल असल्याचे समोर आले. (शताब्दी एक्सप्रेस मध्ये धोतर कुर्ता आणि चप्पल घालून जाणाऱ्या वृद्धाला अधिकाऱ्याने दाखवला बाहेरचा रस्ता, इतिहासातील 'या' घटनेची पुनरावृत्ती)

या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. तसेच पोलिसांनी तरुणाची चौकशी केली असता आपणच तो खोटा फोन केल्याची कबुली दिली. तर हैदराबाद येथील विमानतळावरुन दुसरीकडे त्या तरुणाला जायचे होते. मात्र दारुच्या नशेत आणि प्रेमात फसवणुक झाल्याच्या नैराश्यात असा प्रकार केल्याचे त्याने सांगितले.