फेसबुकवर पत्नीचे फॉलोअर्स वाढल्याने रागाच्या भरात पतीने केली निर्घृण हत्या
Representational Image (Photo Credits: Facebook)

सध्या सोशल मिडियाचे वाढत चाललेलं फॅड पाहता याचा परिणाम कित्येक जोडपी तुटण्याच्या मार्गावर आहेत. किंबहुना काही तुटली देखील असतील. सोशल नेटवर्किंग वाढविण्यासाठी निर्माण केलेल्या सोशल साइट्सचा वापर आता खूपच वाईट कामांसाठी केला जात आहे. ज्यात अनेक गंभीर गुन्हे, सायबर क्राईम देखील आहेत. तर अनेक विवाहित जोडप्यांवरही याचा परिणाम दिसू लागला आहे. ज्यात जयपूरमध्ये एकाने आपल्या पत्नीचे फेसबुकवर फॉलोअर्स वाढले म्हणून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकच नव्हे तर त्याची पत्नी फेसबुकवर व्हिडिओ टाकायची असेही आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

ही घटना जयपूरच्या अंबर पोलीस स्थानक भागातील आहे. जयपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी रक्ताने माखलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी चौकशी करत असताना खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी महिलेचा नवरा अयाज अहमद याला अटक केली आहे.

हेदेखील वाचा- ठाणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला 7 वर्षीची शिक्षा

अयाजच्या पत्नीचे फेसबुकवर अकाउंटवर होते. त्यावर ती अनेक व्हिडिओ टाकायची आणि ब-याचदा मोबाईलमध्येही व्यस्त असायची. असे करता करता 6000 हून अधिक फॉलोअर्स झाले होते. पत्नीचे सोशल मिडियाचे वेडं पाहून संतप्त झालेल्या पतीने कट रचून तिची हत्या केली. या दोघांना 3 महिन्यांचा मुलगाही आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अयाज अहमद आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रेश्मा गेल्या 1 वर्षापासून पतीपासून विभक्त राहत होती. हत्येच्या उद्देशाने पतीने सलोखाच्या बहाण्याने तिला घेऊन गेले. आधी त्या दोघांनी मद्यपान केले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे डोके फोडले आणि पत्नीला ठार मारले.