लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला 7 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत एका वर्षाची शिक्षा आणि 35 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. ही घटना ठाणे ( Thane) परिसरात घडली आहे. आरोपीने हा गेल्या अनेक वर्षापासून संबंधित तरुणीसोबत राहत होता. याशिवाय त्याने पती-पत्नी वास्तव्य करुन तिच्याशी शाररिक संबंध ठेवले होते. परंतु, पीडिता लग्नाचे नाव घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करत असे. यामुळे तरुणीने आरोपीच्या आईवडीलांकडे आपली कैफियत मांडली. परंतु, त्यांनीही या लग्नाला असमर्थता दर्शवल्यानंतर पीडिताने महिला आयोगात आरोपी आणि त्याच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नवीनकुमार प्रेमशंकर तिवारी असे आरोपीचे नाव आहे. नवीनकुमार हा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रहवासी आहे. नवीनकुमार हा कुर्ला येथील कॅटरिंगमध्ये काम करित होता. दरम्यान त्याचे एका तरुणीसोबत प्रेम जुळले होते. त्यानंतर नवीनकुमार याने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून मुंब्रा कॉलनी येथील एका भाड्याच्या घरात ठेवले. त्यावेळी त्याने पती पत्नीचे वास्तव्य करुन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. ज्यावेळी संबंधित पीडित लग्नाचे विषय काढायची, त्यावेळी नवीनकुमार सतत टाळाटाळ करत असे. यामुळे पीडिताने नवीनकुमारच्या आईवडिलांकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी दरम्यान, त्यांनीही उच्चवर्णीय असल्यामुळे तिच्यासी मुलाचे लग्न लावून देण्यात असमर्थता दाखवली. अखेर पीडिताने राज्य महिला आयोगाकडे नवीनकुमार याच्यासह त्याच्या पालकांची तक्रार नोंदवली होती. आयोगाने हे प्रकरण मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केले, त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी 2014 मध्येच तिघांनाही अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. हे देखील वाचा- मालाड: दुकान मालकाकडून दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या एका निरीक्षकाला अटक
या खटल्याची अंतिम सुनावणी 18 जानेवारी 2020 रोजी झाली होती. त्यावेळी आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडिताच्या वकिलांकडून करण्यात आली होती. सर्व पुरावे आणि मुंब्रा पोलिसांच्या आधारावर न्यायलयाने आरोपीला गुन्हेगार ठरवले असून त्याला 7 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत एका वर्षाची शिक्षा आणि 35 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.