
दुकानामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करण्याकरिता लागणाऱ्या परवन्यासाठी दिड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या एका निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मालाड (Malad)परिसरात घडली. आरोपी मालाड येथील पालिकेच्या पी उत्तर कार्यलयात कार्यरत आहे. आरोपी हा अनेकांकडून लाच घेत असल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंध विभागाला होता. त्यानुसार त्यांनी आरोपीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपीने एका दुकानदाराला खाद्य पदार्थाच्या विक्रीकरिता तब्बल दिड लाखाची मागणी केली होती. ही माहिती लाचलुचपत विभागाला कळल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात सापळा रचत त्याला रंगे हाथ पकडले.
परेश कोरगावकर असे या निरीक्षकाचे नाव असून ते मालाडमधील पालिकेच्या पी उत्तर कार्यालयात कार्यरत आहे. मालाड येथे एका विक्रेत्याचे भूमी स्टोअर्स हे दुकान आहे. तसेच आपल्या दुकानात इतर वस्तूप्रमाणे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी संबंधित दुकानदाराने परेश यांच्याकडे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या परवान्यासाठी मदत मागितली. त्यावेळी परेशने दुकानदाराकडे तब्बल दिड लाख रुपयांची मागणी केली, अशी माहिती विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने परेश याच्याविरोधात सापळा रचत त्याला लाच घेताना रंगे हाथ पकडले आहे. त्यावेळी परेश याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- प्लास्टिक कपचा वापर केल्याने बीडमधील जिल्हाधिका-याने स्वत:लाच ठोठावला पाच हजार रुपयांचा दंड
लाच घेणे आणि देणे हे कायद्याने गुन्हे असताना अनेक पालिकेचे अधिकारी काही लोकांकडून लाच घेत असल्याचे समजते आहे. अशाप्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याससाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.