भारताता कोरोना संक्रमितांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासांत देशात 6767 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे रुग्णांची एकूण संख्या 1,31,868 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 147 रूग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 3867 वर पोहोचला आहे. सद्य स्थितीत देशात 73,560 रुग्णांवर उपचार सुरु असून 54,441 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. ही संख्या पाहता कोरोना रुग्णांची संख्या होणारी वाढ ही चिंताजनक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच वैद्यकिय यंत्रणा सज्ज आहेत.
देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांची एकूण संख्या 47,190 आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडूमध्ये 15,512 तर गुजरातमध्ये 13,664 रुग्ण आहेत. नवी दिल्लीत रुग्णांची एकूण संख्या 12,910 वर पोहोचली आहे. Coronavirus Update: गेल्या 24 तासात BSF च्या 21 जणांना कोरोनाची लागण; एकूण COVID19 रुग्णांची संख्या 120 वर
Highest ever spike of 6767 #COVID19 cases & 147 deaths in India in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,31,868, including 73,560 active cases, 54,440 cured/discharged and 3867 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/0r5cnBfxnC
— ANI (@ANI) May 24, 2020
महाराष्ट्र राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शीथिल करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे