Coronavirus Update: गेल्या 24 तासात BSF च्या 21 जणांना कोरोनाची लागण; एकूण COVID19 रुग्णांची संख्या 120 वर
Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा प्रभाव हा सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवानांवर होत असल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासात सुद्धा बीएसएफ मधील तब्बल 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. यानुसार सद्य घडीला बीएसएफ मधील 120 जण हे कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट होत असून त्यांच्यावर नेमून दिलेल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात दिलासादायक म्हणजे, आजवर बीएसएफ मधील तब्बल 286 कोरोना रुग्णांनी या जीवघेण्या विषाणूंवर मात केली आहे. याबाबात सविस्तर माहिती दिली सीमा सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली आहे. CRPF च्या आणखी 9 जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आकडा 335 वर पोहचला

प्राप्त माहितीनुसार यापूर्वी बीएसएफ मधील 2 जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच BSF च्या दिल्लीमधील मुख्यालयात सुद्धा कोरोनाग्रस्त आढळल्याने हे कार्यालय 4 मे रोजी सील करण्यात आले होते. निर्जुंकीकरण प्रक्रीयेनंतर 6 मे रोजी मुख्यालय पुन्हा सुरु करण्यात आले होते. दुसरीकडे महाराष्ट्रात सुद्धा पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोना काळात आघाडीवर राहुन आपली ड्युटी पूर्ण करणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत या घटनांमुळे प्रश्न निर्माण झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6654 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,25,101 वर पोहोचली आहे. तर मागील 24 तासांत कोरोनामुळे 137 रुग्ण दगावले असून देशात मृतांचा एकूण आकडा 3720 वर पोहोचला आहे. सद्य स्थिती देशात 69,597 रुग्णांवर उपचार सुरु असून 51,784 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.