Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

ब्रिटनमध्ये कोरोना वायरसमध्ये (Coronavirus) म्युटेशन आढळून आल्यानंतर वाढलेला धोका पाहता भारताने युके- भारत (UK-India) विमानसेवा काही दिवस स्थगित केली होती. मात्र आता 8 जानेवारीपासून पुन्हा मर्यादित प्रमाणात विमानसेवा खुला केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार, आता प्रत्येक प्रवाशाला स्व खर्चाने कोवीड 19 च्या निदानासाठी आरटी पीसीआर टेस्ट (RT PCR Test) करावी लागणार आहे. हा अहवाल कमाल 72 तास जुना असावा असे नमूद करण्यात आले आहे. India-UK Flights: भारत-ब्रिटन विमानसेवा 8 जानेवारीपासून सुरु होणार; विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट.

आज केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत - युके विमानसेवा 6 जानेवारी तर युके-भारत विमानसेवा 8 जानेवारीपासून सुरू होईल. प्रत्येक आठवड्याला 30 फ्लाईट्स उड्डाण घेणार आहेत. प्रत्येकी 15-15 फ्लाईट्स इतकीच त्यांची संख्या असेल. दरम्यान हे वेळापत्रक 23 जानेवारी पर्यंत लागू असेल.

ब्रिटन वरून येणार्‍यांसाठीची SOP

  • विमानतळावर आरटीपीआर टेस्टच्या निकालाची प्रतिक्षा करणार्‍यांसाठी स्वतंत्र सोय असावी.
  • आरोग्य यंत्रणांकडून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्यांना स्वतंत्र आयसोलेशन रूम मध्ये ठेवले जावे. त्याची योग्य सोय केलेली असावी.
  • ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा रूग्ण असल्यास त्यांची सोय देखील स्वतंत्र केलेली असावी.
  • अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 14 व्या दिवशी पुन्हा तपासणी केली जावी. जो पर्यंत अहवाल निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत त्याला स्वतंत्रच ठेवले जावे.
  • विमानतळावर प्रवाशांना नव्या एसओपीची माहिती व्हावी म्हणून विशेष मदत कक्ष स्थापन करावा.

सध्या ब्रिटनमधील या नव्या वायरसने जगभरातील इतर अनेक देशांमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, चीन, इटली, नेदरलॅड यांचा समावेश आहे. भारतामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे. 24 देशांसोबत भारताने एअर बबल पॅक्ट करून काही प्रमाणात ये-जा सुरू केली आहे. दरम्यान सध्या भारतात नव्या कोरोनाचे 29 रूग्ण आढळले आहेत.