प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

जर तुम्ही गृहकर्ज घेण्याच्या विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी फार महत्वाची बातमी आहे. कारण एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी गृहकर्ज स्वस्त केले असून या सुविधेचा फायदा नव्या आणि जुन्या ग्राहकांना होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एचडीएफसी बँकेचे गृहकर्जासाठी व्याजदर 0.05 टक्क्यांनी कमी करणार असल्याची घोषणा केली आहे.

कंपनीने एका विधानात असे म्हटले आहे की, एचडीएफसी बँकेने गृहकर्जावरील LPR कमी केले आहे. त्यानंतर ARHL सुद्धा 0.05 टक्क्यांनी कमी झाले आहे. हे नवे दर 6 जानेवारी पासून लागू होणार आहेत. बँकेने त्यांचे गृहकर्जाचे दर LPR च्या आधारावर तयार करण्यात आले आहेत. एचडीएफसीचे नवे दर 8.20 टक्के ते 9 टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे. बँकेच्या गृहकर्जाची ही सुविधा सर्व ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तसेच काही दिवसांपूर्वीच स्टेट बँकेने सुद्धा त्यांच्या ऑटो आणि गृहकर्ज दरात कपात केली आहे. त्यामुळे नवं घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी व्याजदर 7.90  टक्के असणार आहे. यापूर्वी व्याजदर 8.15 टक्के होता. तर बँकेने EBR मध्ये ही घट करत 8.05 वरुन 7.80 टक्क्यांवर आणला आहे.(RBI च्या सत्तत नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये, आकार बदलण्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह; सहा आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश)

तर ऑक्टोंबर महिन्यात आरबीआयने त्यांच्या रेपो रेट दरात पाचव्यांदा कपात केली होती. त्यानुसार रेपो रेट ने 1.4 टक्क्यांवरून 0.24 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. म्हणजेच 5.40 टक्क्यांवरून 5.14 टक्के इतका आला आहे. केंद्रीय बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ऑगस्ट महिन्यात चौथ्या वेळेस रेपो रेट दरात 0.35 टक्क्यांनी कपात केली होती. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांकडून कर्ज घेणे आता स्वस्त झाले होते.